अहमदनगरमधील चांदबीबीच्या महालाजवळ असलेली मस्जिद परवा पावसामुळे जमीनदोस्त झाली

 विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी चांदबीबी  होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते .
त्याच राणीच्या महालाजवळ असलेली मस्जिद परवा पावसामुळे कोसळली. 
प्रशासनाचे दुर्लक्ष व सरकारी अनास्था यामुळे हा अनमोल ठेवा अहमदनगर करांना गमवावा लागला 

 शहा डोंगराच्या पायथ्याशी पश्चिमेकडील बाजूला असलेली  मस्जिद  ढासळली आणि दूसरी जेऊर-इमामपूर नजीक (घाट चढून आल्यानंतर) रस्त्यालगत आहे परंतू तिचे मुघलकाळात धार्मिक स्थळात रूपांतर झाल्याचे  पुरावे ब्रिटिश गॅझेटमध्ये आढळून येतात
या मशीदीच्या पडझडीबद्दल चौकशी करण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...