प्रशासनाच्या निर्बंधामुळे यंदाच्या कुर्बानीच्या ईदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले.


गेल्या महिनाभरापूर्वी गावाकडील मित्राने पाळलेल्या चार बकऱ्यांचा फोटो पाठवला जेणेकरून कुणाला हवी असतील तर विचारण्यासाठी वर्षभराचा बकरा कुर्बानीला तालुक्यातील लोक घेत असल्याने चांगला सांभाळलेला ! जर वर्षी साधारण 20 किलो बोकडाचे कुर्बानी साठी किमान एकाचे  15000 होतील हे गणित होत.
काल त्याचा फोन आला होता कालपर्यत एकाही बोकडाची विक्री झाली नव्हती. मी ज्या मशिदीच्या क्षेत्रात राहतो त्या भागात किमान 80 बकरे प्रत्येक वर्षी पडतात. पण वाहतुकीच्या बंधनामुळे आणि प्रशासनाच्या त्रासामुळे भीतीमुळे त्यांची संख्या 10 वर आहे... 
काल गुजरात सीमेवर बकरे भरून येणारे राजस्थानी, सुरती  शेळ्यांचे   500 ट्रक शेतकऱ्यांनी भरून आणलेले माघारी गेले. 
सगळ्यात नागपूर विमानतळावरून आखाती देशात निर्यात होणारा बोकड यंदा निर्यात होणार नाही. 
धनगर बांधवांच्या पशुपालन पावसात कमी केले जाते पण ठीक ठिकाणी उठाव नसल्याने जनावरे रोगग्रस्त आहेत. 

🐩ईद जवळ येताच भक्तांनी 'Bakralivesmatter सारखे trend पसरवले, आणि  ईद न करण्याचे किंवा प्रतिकात्मक कुर्बानी करण्याचे सल्ले देऊ लागले ! अर्थात त्यांना फक्त धर्माचा द्वेष आहे. असो,  परंतु त्यांनी दुसरी बाजू पण समजून घ्यायला हवी होती, जरी ईद मुस्लिमांचा सण असला तरी Indirectly आर्थिक दृष्ट्या हा सण गैर मुस्लिमांशी निगडित आहे, कारण देशाच्या ग्रामीण भागात राहणारा शेतकरी वर्ग जो कि मोठया प्रमाणात इतर धर्मीय  आहे, तो ग्रामीण वर्ग शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो, ज्या प्रमाणे प्रत्येक प्रकारच्या व्यापारी वर्गाचा एक ठरविक सीजन असतो त्यात तो जास्त कमाई करतो, त्याच प्रकारे कुर्बानीची ईद हा पशुपालन व्यवसाय किंवा जोडधंदा करणाऱ्यासाठी एक सीजन असतो !!

ग्रामीण भागात चालणारे गोट फार्म किंवा शेळ्या, मेंढी पालन करणारा वर्ग कुर्बानीची ईद च्या 5-6 महिने आधी पासून आपल्या जनावरांची काळजी घेतो, त्यानां आहार आणि खुराक योग्य देण्यासाठी खर्च करतो, जेणेकरून ईद पर्यत चांगला प्राणी तयार केला तर ईद काळात जास्त पैश्याला विकता येईल व चांगला फायदा होईल !! त्याचप्रमाणे याच  ईद च्या काळात चामडी उद्योग चा सुद्धा सीजन असतो, प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर चामडी उपलब्ध होतात त्याची खरेदी-विक्री होते, चामडी शी निगडित उद्योग जसे चप्पल, बॅग, etc. अनेक चामडी वस्तू आणि त्यांचा व्यापार याच सीजन मध्ये मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे जरी हा सण मुस्लिमांचा असला तरी आर्थिक दृष्टीने गैर मुस्लिमांशी निगडित आहे. 

अफवेच्या बाजाराने यंदा कुकूटपालन मधून सावरणारा शेतकरी डबघाईला आला आहे. 
याबाबीचा भक्तांनी विचार करावा. 

सर्वाना ईदच्या शुभेच्छा ! शासनाच्या नियमाचे पालन करून ईद साजरी करा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...