मालेगावचा युनानी काढा ठरतोय गुणकारी युनानी डॉक्टर्स असोसिएशन तर्फे भव्य शिबिरात रोगप्रतिकार शक्तीचा युनानी जोशांदा (काढा) उपलब्ध..
युनानी डॉक्टर्स असोसिएशन तर्फे भव्य शिबिरात रोगप्रतिकार शक्तीचा युनानी जोशांदा (काढा) उपलब्ध
कोरोना विरुद्धच्या लढाईत संपूर्ण विश्वात या रोगाच्या नियंत्रणासाठी उध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . डॉक्टर्स वाढत्या पेशंट संख्येच्या उपचारासाठी आणि पोलिस यंत्रणा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपाय योजनेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत . सर्वच वैश्विक मेडिकल संघटनांचे यात एकमत आहे की कोरोनाची लस येईपर्यंत किंवा लस उपलब्ध झाल्यानंतरही रुग्णांची मजबूत रोगप्रतिकारक शक्ती चा या संसर्गिय आजारात महत्वाची भूमिका आहे .
यासाठी वेग वेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करण्यात येत आहे , तसेच नव नवीन शोध प्रक्रिया सुरू आहेत . दरम्यान लोकांना विसर पडलेल्या परंतु खूप लाभदायक अशा युनानी उपचार पद्धतीने भारतामध्ये एक युनानी जोशांदा तयार केला आणि यापासून होणाऱ्या चमत्कारिक फायदे पाहून खूप कमी दिवसांत या युनानी काढा, जोषांदा ने प्रचंड लोकप्रियता मिळवली . आणि जवळ जवळ संपूर्ण देशात लोकं या पासून फायदा उचलत आहेत .
ना आजाराला कोणता जात धर्म असतो आणि ना त्या आजारांच्या उपचाराला .
धुलिया युनानी डॉक्टर्स असोसिएशन ने या युनानी फॉर्म्युला ला लोकांच्या सोयी साठी या औषधला तरल जोषांद्यात तयार करून आज मुनिसिपल कॉर्पोरेशन चे पदाधिकारी , धुळ्याचे आमदार मा. फारुक शाह साहेब , जमियत उलेमा चे अध्यक्ष मुफ्ती कासीम साहेब, आयुक्त मा. अजीज शेख साहेब तसेच धुळे शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि खास करून कोरोणा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर युनानी औषध सर्व सामान्य जनतेसाठी उपलब्ध केले .
यासाठ देि. ११-०७-२०२० रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत मूनिसिपल कॉर्पोरेशन चे ८० फुटी रोड वरील दवाखान्यात शिबिराचे आयोजन केले होते . यात आलेल्या लोकांची युनानी डॉक्टर्स असोसिएशन चे डॉक्टरांनी मोफत प्राथमिक तपासणी देखील केली आणि रुग्णाच्या गरजेप्रमाणे त्यांना अल्प दरात हा युनानी जोशांदा देण्यात आला .
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुफ्ती कासिम साहेब, मुफ्ती मसूद अहमद साहेब, वैद्यकीय अधिकारी महेश मोरे साहेब, डॉ. मसरूर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी देखील शिबिरास भेट दिली .
सर्वच मान्य वरानी धुलीया युनानी डॉक्टर्स असोसिएशन चे आभार व्यक्त केले आणि एकमताने पूर्ण धुळे जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले . शिबिराच्या यशस्वितेसाठी लोकसेवा ग्रुप , धुळे यांनी नियोजन सांभाळले.
कार्यक्रम आयोजक : युनानी डॉक्टर्स असोसिएशन
डॉ. मिन्हाज काजी डॉ. अजीजूर्र्ह्मान
डॉ. जियाऊद्दीन डॉ. सलमान अन्सारी
डॉ. शाहीद बागवान डॉ. अब्दुल्लाह अन्सारी
.....................................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा