माफीचा साक्षीदार न होता देशासाठी फाशी गेलेला 26 वर्षीय क्रांतीकारक

स्वातंत्र्यसेनानी वक्कम अब्दुल कादर.
-------------------------------------------------------------------भारताला स्वातंत्र्य मिळाले तो महिना रमजानचा होता याचा प्रत्येक भारतीय अभिमान बाळगतो पण एक असा क्रांतिकारक फासावर जाताना आपल्या वडिलांना लिहलेल्या शेवटच्या पत्रात म्हणतो कि, "अल्लाह ची कृपा आहे कि रमजान महिन्यात मी शहिद होत आहे"  तो क्रांतिकारी वक्कम अब्दुल कादर.

केरळचे राहणारे 26 वर्षीय वक्कम अब्दुल कादर 25मे 1917 ला जन्मलेले. पित्याचे नाव बाबा खून्हु व आईचे नाव उन्मे सलमा. 22 व्या वर्षी मलेशियाला रोजगारासाठी गेलेले 

त्यानंतर रासबिहारी बोस यांच्याशी झालेली भेट व सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मी मध्ये कार्यरत मेंबर होऊन स्वराज पलटणीत प्रशिक्षण घेतले. 

18डिसेंबर1940 रोजी भारतातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी वीस जणांच्या Sucidal Squad सोबत भारतात आले. मलबार किनाऱ्यावर समुद्रात पोलिसांनी घेराव घालताच समुद्रात उडी मारून सोबतची कागदपत्रे समुद्रात बुडवली.ती इंग्रजांच्या हाती लागू दिली नाहीत. हि मारलेली उडी खोल समुद्रात होती. ज्या पद्धतीने क्रातींकारी नाना पाटील यांनी कृष्णेच्या डोहात मारलेली उडी वंचित राहिली त्याप्रमाणे हि देखील दुर्लक्षित झाली 
   इंग्रजांनी अतोनात छळ करून ती गुप्त माहिती काढण्याचे  व माफीचा साक्षीदार होण्यासाठी प्रयत्न केले.प्रलोभने दाखवली पण कोणतीही तडजोड केली नाही. 
पकडून त्यांना कालिकत येथे ठेवून 18डिसेबर1943
रोजी 26व्या वर्षी फाशी देण्यात आले.त्यांचे  हे पत्र दुसरे क्रांतिकारी वक्कम मजीद यांनी त्यांच्या मजार वर लावले. 
#क्रांतीकारी 
#स्वातंत्र्यसेनानी 
#VAKKOM_ABDUL_KHADER
#समुद्रात_मारलेली_उडी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...