हमने तो मंदिर समझकर माथा झुकाया था, क्या पता था भेड़िए की मांग होगी
1988 ची गोष्ट. उत्तरभारतात "सजग भारत"/ 16 पानी वृत्तपत्र प्रकाशित होत असे. बुंदेलखंडामध्ये जवळजवळ दहा जिल्ह्यात तालुकास्तरावर हे वृत्तपत्र वितरित केले जात होते. लहान मुलांपासून सर्वजण ह्या वृत्तपत्राची वाट पाहत असत. एका अंकात एक स्टोरी छापली गेली होती. हिंदीत त्याच शीर्षक होत "हमने तो मंदिर समझकर माथा झुकाया था, क्या पता था भेड़िए की मांग होगी." हि स्टोरी जिल्हा जज खरे यांच्यावर होती. छतरपूरमधील एक फर्निचर व्यापारी यांनी आरोप लावला होता की न्यायाधीश साहेबांनी फर्निचर मागवले पण पैसे दिले नाहीत . यासाठी फर्निचर व्यापारी याने 10 रु स्टॅम्प पेपरवर कबुलीजवाब लिहून दिला होता. त्याच्या आधारे 'सजग भारत ' वृत्तपत्राने स्टोरी केली होती. जिल्हा न्यायाधीश खरे साहेब यांनी न्यायालयाच्या अवमानाची नोटीस काढली. प्रकरण जबलपूर उच्चन्यायालयात गेले. याबाबत वृत्तपत्राच्या वकिलांनी व्यक्तिगतरित्या लिखाणातून खरे यांच्यावर ताशेरे ओढल्याचे यात न्यायालयाचा अवमान कुठेही झाला नसल्याचे सांगितले. कारण फर्निचरची खरेदी न्यायालयाने केली नव्हती ती खरेदी न्यायाधीश खरे यांनी केली...