स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाचे योगदान देणारे रफिक किडवाई यांची 18 फेब्रुवारी आज जयंती.
स्वतंत्रता आंदोलनात 10 वर्ष जेलमध्ये व्यतीत करणारे महान सेनानी रफी अहमद किडवाई.मसौली जिल्हा बाराबंकी चे प्रसिध्द जमीनदार मोठे स्वातंत्र्य सैनिक.
भारतात सर्वात प्रथम आपल्या संपत्तीला 'कुळ कायदा' लागू केला.जे गरीब शेतकरी त्यांच्या शेतजमीनीत काम करत होते त्यांच्या नावावर त्यांनी जमीनी दान केल्या व त्यांच्या नावे केली व उत्तर प्रदेशातून जमीनदारीचा खात्मा केला.
भारताचे कर्तबगार दुरदृष्टीचे मंत्री रात्रीच्या हवाई डाकसेवेची सुरुवात केली.
पोस्ट, टेलीग्राम मध्ये काम करणाच्या २५ लाख कर्मचाऱ्यांना रविवारच्या सुट्टीची भेट दिली आजच्या जमान्यात एक साधा शिपाई सुध्दा लाखो रुपये बँक बॅलन्स ठेवतो पण भारत सरकारच्या या एका मोठ्या मंत्र्याचा मृत्यू वेळी फक्त १५६० रु.बँक बॅलन्स होता.
रफी अहमद किडवाई यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1894 ला मसौली जिल्हा बाराबंकी उत्तर प्रदेश येथे झाला. वडीलाचे नाव इमतियाज अली व आईचे नाव रसीउलनिसा हे होते. आपण दहा वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पालन पोषण काका ही इनायतअली यांनी केले. त्या दिवसात काकाच्या घरी ब्रिटिश सरकारच्याविरोधात नेहमी सभा आणि चर्चासत्र होत असे, याचाच परिणाम आपल्यावर पूर्णपणे झाला. अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असताना ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होते. आपण खिलापत मूव्हमेंट आणि अदमताऊन मूव्हमेंट च्या माध्यमातून आंदोलनात भाग घेणे सुरू केले. त्यानंतर आपला राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समावेश होऊ लागला. ऑक्टोबर 1940 मध्ये सत्याग्रह मूव्हमेंट आपल्या नेतृत्वात करण्यात आले. यासाठी आपल्याला 10 वर्ष जेलमध्ये व्यतीत करावे लागले.जेलमधून परत आल्यानंतर मुस्लिम लीग च्या मोहिमेचा आपण जबरदस्त विरोध केला. जनतेपर्यंत हा विरोध पोहोचण्यासाठी कौमी आवाज हे मॅक्झिन काढले.त्यामधून लिखानद्वारे जागृती केली.
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण केंद्रात मंत्री झाले.
१९५८ मध्ये महाराष्ट्रात कडक दुष्काळ पडला. खास करुन सोलापरजिल्ह्याची परिस्थिती खुप खराब झाली होती. अन्नमंत्री असल्याने रफी अहमद सोलापूर जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी आले. सोलापूरच्या कलेक्टरने त्यांच्या राहण्याची चांगलीच व्यवस्था केली होती पण त्यांनी मोकळ्या मैदानात कॉटवर
झोपणे पसंत केले, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्यांना खूपच त्रास झाला आणि रात्रभर जागुन पहारा देत राहिले. सकाळी फजरच्या नमाजनंतर चहा पिल्यावर त्यांनी कलेक्टरला गावात दौरा करण्यासाठी चलण्यास सांगितले ज्यामुळे सर्व स्टाफ मध्ये पळापळी सुरू झाली. सिक्यूरिटी गाड्यांची व्यवस्था प्रत्येक विभागाच्या जबाबदार अधिक-यांना माहिती देणे कठिण झाले होते. सर्व अधिका-्यांना वाटले होते की, केंद्रीय मंत्री आहेत सकाळी नऊ वाजता उठतील.दहा वाजता नाष्टा करतील आणि त्यानंतर दौऱ्याला सुरवात करतील पण इथे वेगळाच अनुभव आला. पण तरीही कलेक्टरने लवकरच सर्व तयारी पुर्ण करून मंत्र्याचा फौजफाटा दुष्काळी दौऱ्यासाठी रवाना झाला. रफि अहमद साहेब प्रत्येक गावात थांबत. लोकांशी भेट घेत परिस्थितीचे आकलन करत त्यावर सरकारी अधिकार्यांना लगेच कार्यवाहीसाठी मदतीसाठी सांगत. एका ठिकाणी तर
लोकांना तिखट तांदळाची पेज वाटप करण्यात येत होती, तेही स्वतः तिकडे गेले आणि एक प्याला तांदळाची पेज घेऊन पिऊन त्याच्या चवीची तपासणी केली. ते पुर्ण दिवस न थांबता दौरा करुन सायंकाळी ६ वाजता सोलापूरला पोहचले.
रात्री ८ वाजता शहरातील प्रसिध्द व्यक्ती हाजी अब्दुल करीम खैरदी येथे रफी अहमद साहेबांना जेवणाचे आमंत्रण होते, वेळेवर त्यांच्या बंगल्यावर पोहचले, जेवणाची चोख व्यवस्था केली गेली होती. डायनिंग टेबलावर ठेवलेल्या पकवानांना पाहून म्हणाले की, बंधूंनो ! मी आत्ताच दुष्काळी भागाचा दौरा करुन
येथे आलो आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की, गरीब लोकांना भरपूर प्रमाणात तांदळाची पेज सुध्दा मिळत नाही आणि मी अन्नमंत्री ह्या नात्याने त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि अश्या परिस्थितीत हे अन्न माझ्या गळ्यातून खाली उतरणे शक्य नाही. आपले हे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व पाहुणे सुन्न होऊन उभे होते. मग आपण यजमान हाजी साहेब खैरदीना विचारले आपल्या भागात कोणते पदार्थ प्रसिध्द आहे ? त्यांनी सांगितले 'दालचा खाना' प्रसिध्द आहे. मग स्वतःच्या हाताने एका प्लेटमध्ये थोडे भात घेऊन त्यावर दालचा घेऊन खाल्ले आणि सर्वांचे आभार मानून तेथून निघून गेले.पं.नेहरु,गोविंदपंत ,गांधीजी मौलाना आझाद आणि आणखी मोठ्या मार्गदर्शकांबरोबर स्वतःही मोठ्या हिरीरीने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. इंग्रजांचे त्रास, शिक्षा सहन केली आणि आपल्या आयुष्याचे जवळपास १0 वर्ष जेलमध्ये व्यतीत केले आणि आपल्या राजकीय आणि सामाजिक जिवनातील शेवटच्या श्वासापर्यंत गरीबांसोबत राहिले आणि तन,मन, धनाने त्यांची सेवा केली.अखेर 24 ऑक्टोंबर 1954 मध्ये दिल्ली येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच आपला मृत्यू झाला.
मृत्यूनंतर अंतिम दर्शना वेळी एक व्यक्ती रडत म्हणाला की, "आज शेकडो गरीब मुले अनाथ झाली". पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना या कर्तव्यदक्ष सोबतीवर खुप गर्व होता. आमचा रफीभाई मानव दोस्त व्यक्ती होता. रफी अहमद मध्ये खास गुण होता की, जे काम हातात घेत त्यावर पूर्ण लक्ष केद्रित करत एखाद्या मुद्याच्या, त्रासाच्या, मुळापयंत जावून त्याच्यावर उपाययोजना करीत.सरकारी आधिकाऱ्यांचे सल्ले आणि फाईल्स वर विश्वास न ठेवता ते स्वतः फिरुन लोकांमध्ये जावून परिस्थितीचा आढावा घेत आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करत
देश आपला सदैव ऋणी राहील.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
संदर्भ -1)IMMORTALS
लेखक sayyad naseer ahmad (9440241727)
2)जंग ए आजादि और मुसलमान
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा